लातूर/प्रतिनिधी

शहरातील हडको कॉलनी परिसरात शनिवारी सकाळी एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलजवळील ग्रीनबेल्टमध्ये असलेल्या गुलमोहराच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत युवकाचे नाव अश्वजीत किशोर सावंत असे आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या प्रकरणी रामहरी फकीरा सावंत यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बिराजदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!