जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 18,553 कर्मचाऱ्यांना दिले मतदान विषयक प्रशिक्षण !

0

जळगाव, दि.8 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 18553 कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. तर प्रशिक्षणात अनुपस्थित असलेल्या 1410 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रथम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम प्रशिक्षणात एकूण 18553 कर्मचारी उपस्थित होते. तर 1410 कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आले आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 412, मतदान अधिकारी क्रमांक एक 420, इतर मतदान अधिकारी 873, रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 398, मतदान अधिकारी क्रमांक एक 406, इतर मतदान अधिकारी 1141, भुसावळ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 357, मतदान अधिकारी क्रमांक एक 337, इतर मतदान अधिकारी 517, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 438, मतदान अधिकारी क्रमांक एक 418, इतर मतदान अधिकारी 1229, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 422, मतदान अधिकारी क्रमांक एक 403, इतर मतदान अधिकारी 770, अमळनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 388, मतदान अधिकारी क्रमांक एक 387, इतर मतदान अधिकारी 897, एरंडोल विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 353, मतदान अधिकारी क्रमांक एक 364, इतर मतदान अधिकारी 998, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 420, मतदान अधिकारी क्रमांक एक 415, इतर मतदान अधिकारी 816, पाचोरा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 457, मतदान अधिकारी क्रमांक एक 449, इतर मतदान अधिकारी 973, जामनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 408, मतदान अधिकारी क्रमांक एक 385, इतर मतदान अधिकारी 898, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 340, मतदान अधिकारी क्रमांक एक 328, इतर मतदान अधिकारी 736 असे एकूण 18553 कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले.