आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कविता पाटील हिने गो सेवा करून राबविला आदर्श उपक्रम….

0

प्रतिनिधी, दिपक नेवे

यावल/दहिगाव:- शिवशंभू संघटना युवती जळगांव जिल्हा अध्यक्ष कुमारी कविता ज्ञानेश्वर पाटील यांच्या आई चा आज वाढदिवस होता तेव्हा त्यानी वाढदिवसाचे औचित्य साधून हिराई फाऊंडेशन च्या वतीने गो शाळेत जाऊन तेथील गाईची पूजा अर्चना करून त्यांना पूरणपोळी चे नैवेद्य गो मातेला खाऊ घालून गो सेवा करून गो मातेला जीवदान द्या,गो सेवा हीच खरी ईश्वर सेवा.असा संदेश दिला.आपल्या जन्म देणारी जरी आपली आई असली तरी ज्या आईचे दूध पिऊन आपण लहानसे मोठे होत असतो ती आपली गो माता च असते.कविता पाटील ने राबविलेल्या या उपक्रमाप्रसंगी कविता पाटील,दिव्या पाटील आणि गो शाळेतील बंधू उपस्थित होते