विद्यार्थ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी – प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राणीशास्त्र विभागामार्फत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा.अर्जून पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनात शिक्षण आणि निरोगी आरोग्य या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र.प्राचार्या.डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच स्वताच्या आरोग्याची शारीरिक,मानसीक, काळजी घेतली पाहिजे व बारावीच्या विद्यार्थिनींना परीक्षा निमित्त शुभेच्छाही दिल्या .यावेळी कार्यक्रमाला प्रा.डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. एस.पी.कापडे, डॉ.आर.डी.पवार, डॉ. पी.व्ही.पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. अरूण सोनवणे,प्रा.ई.आर.सावकार,
प्रा. सी.के. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.मयुर सोनवणे यांनी केले तर आभार प्रा. राजू तडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. प्रतिभा रावते, डॉ. संतोष जाधव, प्रा.छात्रसिंग वसावे,श्री. मिलिंद बोरघडे, श्री. प्रमोद भोईटे, श्री. अनिल पाटील यांनी परिश्रम घेतले.