पढावद विकासो निवडणुकीत आशीर्वाद गटाचे चेअरमन व व्हा चेअरमन बिनविरोध

0

शिंदखेडा : तालुक्यातील पढावद येथे नुकत्याच  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली त्यात चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली . यात चेअरमनपदी देविदास मूलचंद पवार तर व्हा.चेअरमनपदी विजुभाई रतिलाल ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मात्र विकासो च्या  संचालक पदाची निवडणूक चुरशीची ठरली. या निवडणुकीत देविदास मूलचंद पवार यांच्या आशीर्वाद पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून आल्या. गेल्या २५ ते ३० वर्षापासून देविदास पवार यांची विकासो वर सत्ता आहे. त्यात आशीर्वाद पॅनलच्या चेअरमनपदी देविदास मूलचंद पवार तर व्हा.चेअरमनपदी विजुभाई रतिलाल ठाकरे हे बिनविरोध निवडून आले तर संचालक म्हणून निंबा आत्माराम पवार , योगराज लक्ष्मण पवार , नाटू गेंदा पवार , योगराज रुपसिंग पवार , राजाराम रामदास माळी , राहूल नामदेव ठाकरे , नारायण गोरख ठाकरे , हर्षल मदन परदेशी , फकिरा पुंडलिक खंडारे , उषाबाई साहेबराव पवार , आशाबाई तुकाराम पवार त्याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी महाले , सचिव यशवंत सोनगडा यांनी काम पाहिले . या निवडीबद्दल अॅड . प्रकाश पाटील , गयबू पवार , नाना पाटील , नवल पवार , तुकाराम पवार , शरद पाटील , चंपालाल पवार यांनी सर्व्यांचे कौतुक केले .