झुरखेडा शिवारातुन चक्क ऍल्युमिनीयम प्रकारच्या विद्युत वाहक ताराची चोरी, अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल!

0

धरणगाव:- तालुक्यातील सोनवद कक्षाच्या कार्यक्षेत्रातील झुरखेडा शिवारात अज्ञात चोरट्यांनी ऍल्युमिनीयम विद्युत वाहक ताराची चोरी केल्याचा प्रकार नुकताच  उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशी प्राथमिक माहिती दि.२६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्या भागातील वायरमन महारु पुंडलिक मोरे  वय वर्ष ३३ रा. पाळधी ता. धरणगाव यांच्याकडून देण्यात आली  असता त्यांनी ततालुक्याच्या पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्यानं विरोधात फिर्यादी दिल्यानुसार , सोनवद कक्षाच्या कार्यक्षेत्रातील झुरखेडा शिवारात हेमंत अमृत चौधरी यांच्या शेताच्या गट नं. ७८ मधील डी टी सी  ( ४२३१२२० ) या कोडचा ट्रान्सफॉर्मर पासुन दोन्ही बाजूच्या दिशेने जाणाऱ्या ११ span LT conducter पोलवरील १९८० मीटर लांबीच्या ऍल्युमिनीयम प्रकाराच्या विद्युत वाहक तार चोरीस गेल्याचे वृत्त कळविले आहे त्याप्रमाणे ऍल्युमिनियम विद्युत वाहक ताराची अंदाजे किंमत एकोणचाळीस हजार रुपये असल्याची प्राथमिक माहिती वायरमन यांनी दिली असून त्यांनी असे ही सांगितले की, हे काम मला अथवा माझ्या कार्यालयाची कोणतीही संमती न घेता लबाडीच्या हेतून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले म्हणून मी याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असे त्यांच्या कडून सांगण्यात आले असून पुढील तपास  पोहेकाँ राजेंद्र कोळी हे करीत आहेत.