प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

0

राहुरी, अहमदनगर : राहुरी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने रविवार १८, जुलै २०२१ रोजी रक्तदान शिबीर, कोवीड योद्धा सन्मानपत्र वितरण तसेच संघातील पत्रकारांना विमा पॉलिसी वितरणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी दिली.राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथील योगा केंद्र येथे रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष चिंधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जेष्ठ पत्रकार सुभाष मुदळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.प्रेस संपादक व पञकार संघाचे राज्य अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या वतीने राहुरी तालुक्यात गेली दोन वर्षांपासून विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना महामारीचे संकट अद्याप ही टळलेले नाही. या काळात रक्ताची गरज लक्षात घेता एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात कोवीड काळात नि:स्वार्थपणे सामाजिक कार्य करणार्‍या नागरीकांचा संघाचे सन्मानपत्र देऊन गौरव तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सदस्यांना विमा प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष राजेंद्र वाडेकर उपाध्यक्ष रमेश बोरुडे, उपाध्यक्ष मनोज साळवे, सचिव सुभाष आग्रे, तालुका कार्याध्यक्ष दिपक दातीर, सहसचिव अशोक मंडलीक, प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब भोसले, संतोष जाधव, खजिनदार कमलेश विधाटे, मधुकर म्हसे, सतीश फुलसौदर, मिनाष पटेकर, राजेंद्र म्हसे, आप्पासाहेब घोलप, सचिन ठुबे, राजेंद्र पवार,रहेमान शेख, समीर शेख आर.आर.जाधव, शरद खिलारी, सुनिल सात्रळकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.