राहुरी; पत्रकार दातीर खून प्रकरणातील आरोपी फरार

0

राहुरी ( प्रतिनिधी ):- खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी कान्हू गंगाराम मोरे वय ४२ हा नगर येथील शासकीय रुग्णालयात आजारावर उपचार घेत असताना पोलिसांच्या तावडीतून पसार झाला . करोना बाधित झाल्याने त्यास राहुरी तुरुंगातून उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते.मोरे यास मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी घेवून जाण्याच्या हालचाली सुरू होत्या.मात्र या वेळेतच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून मोरे हा पसार झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यासह बाहेरील रुग्णालय आली आहेत. मोरे हा राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी आहे. दातीर यांचा खून केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चारही आरोपी राहुरी येथील तुरुंगात होते. मात्र तेथेही त्याला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने मोरे यास पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. यातच तो पसार झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.