अलर्ट! कोरोनाबरोबरच नव्या आजारामुळे नाशिक हादरलं; आतापर्यंत २४ जणांचा बळी

0

डॉक्टरांनी सांगितलं की, छोट्या छोट्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका. स्वत:ची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

नाशिक, ४ मे :-  शहरात चक्कर येण्याच्या कारणामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या नव्या आजारामुळे डॉक्टर देखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत. आता शहरात या नव्या आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील विविध भागांमधील राहणाऱ्या या पाच जणांना आधी छातीत दुखत असल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कोरोना  महासाथीच्या आजाराची नाशिकमध्ये चर्चा सुरू आहे. २० एप्रिल रोजी चक्कर येईन बेशुद्ध झाल्यामुळे एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वीच्या आठवड्यात १३ जणांचा देखील असाच बळी गेला होता. १५ एप्रिल रोजी ९ जणांची देखील या अदृश्य आजारामुळे निधन झालं होतं. दोन आठवड्यांपूर्वी २४ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे तरुणांमध्येही हा आजार दिसून येत आहे. मृतांपैकी अनेकजण भररस्त्यात चालत असताना चक्कर येऊन कोसळले, तर काहींना घरातच चक्कर आल्याचं वृत्त आहे.