विधानसभा सभागृहात भाजपा च्या १२ आमदारांचे निलंबन केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा धरणगाव तालूका भाजपा तर्फे निषेध करण्यात आला

0

धरणगाव :-  दि.05 जुलै  रोजी विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी विरुद्ध धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द झाले,ओबीसी समाजाला त्यांचे रद्द झालेले आरक्षण राज्य सरकारने त्वरीत परत मिळवून देण्याकरीता प्रामाणिक प्रयत्न करावे व सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणी करीता काल विधानसभा सभागृहात भाजपच्या 12 लढवय्या आमदारांनी हा विषय लावुन धरत असतांना आघाडी सरकारच्या विधानसभा तालिका अध्यक्षांनी 12 आमदारांना बोलू न देता त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचे खोटे आरोप करून एकतर्फी हुकूमशाही पद्धतीने 12 आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबित केले म्हणून भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्या वतीने विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारून महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.तसेच 12 आमदारांचे निलंबन रद्द करून ओबीसी समाजाला पूर्ववत आरक्षण मिळवून द्यावे ही मागणी करण्यात आली.त्याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटिल,शिरिषआप्पा बयास,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,गुलाब बाबा पाटील,शेखरदादा पाटील, अँड.वसंतराव भोलाने,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी,युवा मोर्चा ता.अध्यक्ष निर्दोष पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,दिनेश पाटील,भालचंद्र पाटील,शिवदास पाटील,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले,शरद अण्णा धनगर,सुनील चौधरी,अनिल महाजन,सुदाम मराठे,राजू महाजन,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,जुलाल भोई,दिपक पाटील,रवी पाटील,समाधान पाटील,रवि मराठे,ज्ञानेश्वर पाटील,विक्की महाजन,लहू महाजन,प्रदीप महाजन,इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते