राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार पो.निरिक्षक. नंदकुमार यांनी स्विकारला

0

राहुरी:- तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक वावी पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांच्या विरोधात भुमिका घेतल्याने वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक दुधाळ हे राहुरीतील अवैध धंदे, चोरी, खून,आदी धंद्यांना लगाम कशाप्रकारे घालतील या कडे राहुरी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी हनुमंत गाडे हे सेवानिवृत्त झाल्याने राहुरी तालुका पो.नि.पद हे रिक्त होते. या राहुरी तालुक्यातील पोलीस ठाण्यात रूजू होण्यासाठी काही पोलिस निरीक्षकांनी भरपूर प्रमाणात प्रयत्न केले. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या कार्यालयात पाटील साहेब यांचे वाचक म्हणून काम पाहत होते. त्यांनी मुंबई, नाशिक, पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी हि राजकीय पुढारी यांना न जुमानता आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रयत्नशील राहून गुन्हेगारी पुर्णतः नष्ट केली.या सर्व गोष्टी लक्षात घेता.पोलीस अधीक्षक यांनी राहुरीच्या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी खरा सिंगम हजर करून राहुरी तालुका पोलीस निरीक्षक पद नंदकुमार यांना दिल्याबद्दल जनतेने आनंद व्यक्त केला आहे.