झुरखेडा ग्रामपंचायतमधील १४ वा वित्त आयोगाच्या चौकशी दरम्यान अपहार उघड झाल्यानंतर बँकेत भरणा करण्यात आला

0

धरणगाव,( प्रतिनिधी ):- तालुक्यातील झुरखेडा ग्रामपंचायत मधील १४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातून परस्पर सह्या करून दोन वेगवेगळ्या रक्कमेचे चेक दोन व्यक्तीनां देण्यात आले होते त्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या खात्यात ती रक्कम वर्ग ही झालेली आहे असे बँक स्टेटमेंट वरून दिसून आले होते. मग गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी झुरखेडा ग्रामपंचायत मधील १४ वा वित्त आयोगाच्या संदर्भात सर्व पुराव्यानिशी मा.नरेंद्र सिंह तोमर ग्रामीण विकास, कृषि और किसान कल्याण एवं पंचायती राजमंत्री दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल केली होती व त्या तक्रारीची तात्काळ दखल ही घेण्यात आली त्यानंतर त्यांनी अप्पर मुख्य सचिव पंचायत विभाग ग्रामविकास मुंबई महाराष्ट्र सरकार यांच्या नावाने पत्र देखील काढण्यात आले मग यांनी ही वेळ न लावता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्यानावाने पत्र काढुन तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले मग जिल्हा परिषद जळगाव यांचेकडून देखील गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव यांना १४ वा वित्त आयोगाच्या संपूर्ण खात्याची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या चौकशी दरम्यान झुरखेडा ग्रामपंचायत च्या १४ वा वित्त आयोगाच्या खात्यातून परस्पर सह्या करून जे चेक देण्यात आले होते त्यातून एक चेक सत्तर हजाराचा व दुसरा चेक एक लाख शहात्तर हजाराचा अश्या रक्कमेच्या चेक साह्याने अपहार झाला होता परंतु त्या दोन्ही चेकचे पेमेंट दि.२४ नोव्हेंबर रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंप्री येथे झुरखेडा ग्रामपंचायच्या १४ वा आयोगाच्या खात्यात अपहार झालेल्या रक्कमेचा भरणा करण्यात आला तसेच पंचायत समिती धरणगाव यांचेकडून अजून पुढील चौकशी चे काम चालू आहे तसेच या प्रकरणात जे जे व्यक्ती दोषी आढळतील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे.