यावलच्या कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जनजागृती आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा संपन्न…

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान आयोजित कार्यशाळा संपन्न झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता‌. प्रमुख पाहुणे म्हणून शनयू रुग्णालय यावल येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ .कल्पना देशपांडे यांनी स्त्रियांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी ह्यावर मार्गदर्शन केले. डॉ देशपांडे म्हणाल्या की स्त्रियांनी आपल्या आरोग्याबद्दल नेहमीच दक्ष असायला हवे कोणत्याही आजाराची वेळीच तपासणी केली पाहिजे ग्रामीण भागात आजही आरोग्य विषयक सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे‌ . यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ‌. सचिन देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की स्त्रियांनी मासिक धर्मासंबंधी सजग राहिले पाहिजे रोजचा दिनक्रम निवडला पाहिजे योगासने, प्राणायाम व आहाराबद्दल जागृत असले पाहिजे ‌ कार्यक्रमाचे अध्यक्ष उप प्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार मार्गदर्शन करताना म्हणाले की आरोग्य ही शरीराची व मनाची संपत्ती आहे प्रत्येक मुलीने आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे‌. तसेच आत्मनिर्भर होण्यासाठी स्वावलंबी झाले पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा‌‌. डॉ. ‌‌एस. पी. कापडे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्राची पाटील यांनी केले तर आभार तेजश्री कोलते हिने मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा‌‌. अर्जुन पाटील, प्रा‌. डॉ पी व्ही पावरा , प्रा .डॉ‌‌. एच. जी. भंगाळे, प्रा आर. डी. पवार,प्रा‌. डॉ‌.अनिल पाटील हे उपस्थित होते. प्रा डॉ. ‌संतोष जाधव, प्रा ‍‌. सुभाष कामडी, प्रा गणेश जाधव, प्रा‌‌. सी. टी. वसावे, प्रा .ईश्वर पाटील,प्रा‌‌. मिलिंद मोरे, प्रा डॉ‌‌. निर्मला पवार, प्रा. ‌भारती सोनवणे, प्रा‌. वैशाली कोष्टी, मिलिंद बोरघडे ,प्रमोद कदम , संतोष ठाकूर ,प्रमोद भोईटे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.