नाशिक येथील  जाबाज अधिकारी मंगलसिंग सूर्यवंशी यांची पोलिसदलातून सेवापर्वाची निवृत्ती

0

नाशिक,( प्रतिनिधी ):-  मंगलसिंग सूर्यवंशी साहेब हे ऐका खेड्यागातून आले आहेत त्यांनी वडिलांबरोबर काही दिवस शेतीमध्येही  काम केले त्यानंतर त्यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून देखील काम केले ते  केल्यावर त्यांनी आपल्या -भारदस्त व्यक्तीमत्त्वाच्या आणि प्रखर बुद्धीमत्तेच्या जोरावर पोलीस खात्यात भरती झाले त्यानंतर एक चाडसी , निर्भिड , गुंडांमध्ये दहशत आणि माणसांमध्ये निर्भयता निर्माण करणारे जेथे गेले तेथे सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय दूर करणारे म्हणुन त्यांची ओळख महाराष्ट्राच्या पोलीस दलात निर्माण झाली धुळे , नंदुरबार , नाशिक , गडचिरोली ही तर त्यांच्या धाडसी कामाची कर्मभूमी ठरली अश्या जाबाज व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मंगलसिंग सुर्यवंशी यांचा पोलीस दलातील सेवापर्वाचा शेवट नाशिक मध्ये दि .३०ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांच्या उपस्थितीत करण्यात आला

ते सेवापर्वाचा कार्यक्रमात आपले नमनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, खरं म्हणजे मी  रिटायर्ड व्हायला नको पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस दलातील वर्दीतच असावं अशी माझी अपेक्षा होती परंतु ती परमेश्वराने ती पूर्ण केली नाही पण ब्रिटिश काळात सांगितले गेले होते की  नागरिक हा साध्या वेश्यात देखील पोलीस असतो म्हणून मी मरे पर्यंत पोलिसच राहील पण आजचा जो कार्यक्रम आहे हा एक योगायोग आहे की दोन सण एकत्र आले आहेत हिंदू धर्मासाठी कोजागिरी पौर्णिमा व मुस्लिम धर्मासाठी ईद ए मिलाप दोघे सण आनंदाचे व उत्साहाचे सण आहेत पण एक नाव सर्व नाशिककरांच्या व कर्मचाऱ्याच्या मुखात आहे असे लक्ष्मण पाटील साहेब व दुसरे नाव मंगलसिंग सूर्यवंशी हे दोन्ही नावे प्रसिद्ध आहे पण एक सुप्रसिद्ध तर दुसरे कुप्रसिद्ध की ज्यांच्याबद्दल पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह बोलत असतात ते लक्ष्मण पाटील साहेब तर ज्याच्या बद्दल निगेटिव्ह बोलत असतात ते म्हणजे मंगलसिंग सूर्यवंशी आजच्या ह्या कार्यक्रमात मला खरा अभिमान वाटतो तो म्हणजे शाळा ती आज इथे भरली आहे विद्यार्थीसाठी पहिली शाळा कुटुंब असते त्यात आई ही पहिली गुरू असते पण अशिक्षित असून ही तीने मला लहानपणी चांगल्याप्रकारे संस्कार दिले आणि ती आज योगायोग ह्या कार्यक्रमात उपस्थित आहे त्यानंतर मी डायरेक्ट पीटीसी ला गेलो तिथे मला करंज सावंत सारखा एक चांगला मित्र मिळाला आणि तो माझा गुरू झाला  त्यानंतर मग पोलीस खात्यात लागल्यानंतर पोलीस खात्यात त्यावेळी सिपीआय नावाचं एक पद असायचं मला त्यावेळी सिपीआय म्हणून असणारे डी के जाधव तेही आज योगायोगाने या कार्यक्रमात उपस्थित आहेत मी एका खेडेगावातील गरीब कुटुंबातुन आलो आहे मी आठवी ते दहावीचे शिक्षण घेत असतांना तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणून पीआय असायचे त्यांचा रुबाब पाहून माझ्याही मनात आले की आपणही पोलीस व्हावं पण त्यावेळी पोलीस खात्यात जाण्यासाठी आपलं पोलीस खात्यामध्ये, राजकीय ,सामाजिक आर्थिक आणि पारंपरिक अस कोणीतरी असावं असा एक लोकांच्या मनात गैरसमज असायचा परंतु आई वडिलांची पुण्याई व  वडिलांचा पाठपुरावा, मार्गदर्शन याच्यामुळे मी डायरेक्ट पोलीस हॉपिसर झालो परंतु काही कारणास्तव मी ह्या कार्यक्रमाला हजर  राहणार नव्हतो कारण या आधी  २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा  कालखंड माझ्या साठी खुपचं वाईट राहिला आहे कारण माझा मुलगा upsc च्या तयारीसाठी दिल्लीला गेलेला होता आणि त्याचा त्या मध्ये अपघाती मृत्यू झाला होता पण दुर्दैवाने त्याचा काल म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी  वाढदिवस  ही होता तसेच माझ्या वडिलांना देखील मयत होऊन बरोबर २८ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं त्याचप्रमाणे नवीन पोलीस दलात जाणाऱ्या मुलांसाठी आदर्श ठरणारे मंगलसिंग सूर्यवंशी साहेब व जाबाज पोलीस अधिकाऱ्याला सेवापर्वा च्या खूप खूप शुभेच्छा