कोरोनाचे नियम पाळून देवळा बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू करावे

0

राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सचिवांना निवेदन

देवळा :- येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे देवळा तालुकाध्यक्ष शिवाजी पवार यांनी देवळा बाजार समितीचे सचिव माणिक निकम यांना दिलेल्या निवेनाचा आशय पुढीलप्रमाणे आहे राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार  कोरोना प्रतिबंधात्मक  नियमानुसार शासकीय विकेंद्रीत विक्री धोरणाच्या अधीन राहून आपण लॉकडाऊन काळात देवळा बाजार समितीच्या मालकीच्या विस्तीर्ण आवारात म्हणजेच  क्र.1 देवळा गावातील मुख्य बाजार समिती आवार व  क्र.2 कळवण रोड वरील आज रोजीचे लिलाव मार्केट आवार याठिकाणी कांदा लिलाव एकाच वेळी दोनीही ठिकाणे वाहने विकेंद्रित पद्धतीने उभे करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून व सोशल डिस्टंसिंग नियम सर्वांनी पाळून लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांचा कांदा मालाचे खरेदीचे नियोजन करता येणे शक्य आहे आणि एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लिलाव करण्यास पायाभूत सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत यामुळे
1. बाजार समितीचा महसूलपण बुडणार नाही.
2. व्यापारी वर्गाला ही खरेदी सोयीस्कर होईल.
3. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला स्पर्धात्मक भावही मिळतील.
4. कोरोना प्रतिबंधात्मक नियम सोशल डिस्टंसिंग चे नियम यांचे पालनही काटेकोर पद्धतीने होईल.      मागणी क्र.2   आपल्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव होतात व त्यांचे भाव फलकाचे मेसेज व्हाट्सअप व इतर ठिकाणी दररोज पाठवले जातात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या मेसेजमध्ये दैनंदिन भाव ,आवक, कमीत कमी भाव, सरासरी भाव, जास्तीत जास्त भाव सोबतच “किती नग माल कोणत्या भावात खरेदी झाला”  म्हणजेच किती वाहने कोण कोणत्या भावात खरेदी झाली याचा नगानुसार किंवा वाहना नुसार वर्गीकरण करून तो मेसेज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावा यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री केव्हा करावी याचे नियोजन करणे फायद्याचे ठरेल.
मागणी क्र.2   देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे व शेतमालाची लिलाव शासकीय सुट्टी वगळता इतर दिवशी कायमस्वरूपी सुरू राहावे ही विनंती.
मागणी क्र.3   नवीन व्यापारी उपलब्ध करून देण्यात यावे यामुळे स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगले भावही मिळतील.
सबब महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना या पत्राद्वारे कांदा लिलाव चालू करण्याची मागणी व वरील उपाययोजना करण्याची मागणी करीत आहे.