जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव – नितीन गर्जे

0

नंदुरबार, दि. 6 (जिमाका वृत्त) – नंदुरबार तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुकीत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नितीन गर्जे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. नंदुरबार तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुकीत जप्त केलेले ट्रक, हायवा, ट्रॅक्टर व जेसीबी या वाहनांच्या मालकांनी दंडाची रक्कम शासनास जमा केली नसल्याने सदर वाहनांवरील जंगम मालमत्ता कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी 16 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिल कार्यालय नंदुरबार येथे या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभाग घेणाऱ्या व्यक्तींनी, संस्थांनी लिलावाच्या दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहनही, तहसिलदार श्री. गर्जे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.