गायराण चुंचाळे गौण खनिजाच्या चोरी प्रकरणी संविधान रक्षक मंडळ आक्रमक भुमिका; जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन

0

प्रतिनिधी, दिपक नेवे

यावल:- तालुक्यातील चुंचाळे या छोट्याशा गावातील गायरान जमिनिवरीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती बनलेली असुन विशेष बाब म्हणजे गौण खनिजांची चोरी कसणाऱ्या या चोरांविरोधात संविधान रक्षक महाराष्ट्र राज्यसचिव सुपडू संदानशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रत्यांनी बेकाद्याशीर गौण खनिज वाहतुकीच्या विरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती, त्याचाच एक भाग म्हणून चुंचाळे येथील चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या गौण खनिजाची चौकशी व संबधित व्यक्ती वरती योग्य ती कार्यवाही करणे बाबत संविधान रक्षक जळगांव जिल्हा युनिट चे वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगांव यांना एक लेखी निवेदन दिले आहे. या पत्रकात संविधान रक्षकच्या शिष्ट मंडळ यांनी स्पष्टपणे आरोप करून मागणी केली आहे की , मागील साथ/आठ महिन्यात यावल तालुक्यातील (चुंचाळे गावाजवळील) गायरान येथून चोरीस गेलेले लाखो रुपयांचे गौण खनिज,हे कोणाच्या अनुमती द्वारे काढण्यात आले व त्या ठिकाणाहून कोणकोणत्या व्यक्तिंद्वारे गौण खनिज वाहतूक केलेली आहे ? याची संपूर्ण चौकशी करून सदरील प्रकरणातील व्यक्तीवर्ती कठोर शासन करण्यात यावे, ह्याच प्रकारचे निवेदन मा. तहीलदार साहेब यांना देण्यात आलेले होते मात्र,त्या वरती चौकशी झाली, मात्र यात चोरी झाली आहे मात्र अहवालात सदर गौण खनिज हे रस्त्याच्या कामात वापरण्यात आले आहे असे स्पष्ट पणे सांगण्यात आले होते,त्याच प्रकरणाचा माहितीचा अधिकार वापरात माहिती मागविले असता,विशिष्ठ प्रकारची माहिती पाठविण्यात आली आहे,हे सर्व लक्षात घेता, संविधान रक्षक जळगांव जिल्हा युनिट पुढे आपली शंका व्यक्त करताना म्हणतात की , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(१) नुसार,गौण खनिज अधिनियम महाराष्ट्र जमिनीवर किंवा जमिनीखाली असलेल्या खाणी,दगडाच्या खाणी,नाले, नदीपात्रे इत्यादी ठिकाणी सापडणाऱ्या खनिजावरील सरकारचा हक्क स्पष्टपणे राखून ठेवण्यात आला आहे.असे असताना देखील शासनाची परवानगी न घेता,हा सर्व चोरीचा प्रकार घडला आहे,तरी ह्या चोरी प्रकरणी त्या ठिकाणचे शासकीय अधिकारी व स्थानिक व्यक्तींचे साटेलोटे आहेत की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अन्वये अवैध खोदकाम व वाहतूक करण्यात येणाऱ्या, व्यक्ती व अधिकाऱ्यांवरती योग्य ती चौकशी करून कार्यवाही व गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी जोरदार मागणी करून , सदरहू बाबीचे गांभीर्य लक्षात घेता गायरान (चुंचाळे.ता यावल) येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करून याची माहिती सात दिवसाच्या आत देण्यात यावी,अन्यथा संविधान रक्षक या सामाजिक संघटनेच्या वतीने संवैधानिक पद्धतीने आंदोलन केले जाईल ,असा इशारा देताना श्रीकांत वानखेडे यांनी सांगितले की , याप्रकरणी संविधान रक्षक जळगांव जिल्हा युनिट चे सर्व पदाधिकारी यांच्या सोबत विचारविनिमय करून पुढील पत्र व्यवहारास चालना देण्यात येईल. यावेळी निवेदन देताना संविधान रक्षक जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे,मुख्य संघटक डॉली वानखेडे,यावल तालुका कार्याध्यक्ष विनोद भालेराव,यावल तालुका सचिव शिवाजी गजरे,सचिव विनोद सोनवणे , संघटक राजू वानखेडे, यावल तालुका प्रसिद्धी प्रमुख करण ठाकरे, अनमोल सहकार्य सुपडू संदानशिव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.