महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना होतोय मनस्ताप

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील चुंचाळे येथील ग्राहकाने MSEDCL QR द्वारे वेग वेगळे असे दोन वीज बिल रक्कम १७२० रु. वीज बिल भरणा ८ मे रोजी केला आहे. ग्राहकाकडे त्याची ऑनलाईन पावती देखील आहे. पन साकळी येथील महावितरण चे अधिकारी यांनी ग्राहकाला असे सांगितले की, आपण भरलेले बिल हे आमच्याकडे प्राप्त नाही? आपल्याला पुन्हा वीज बिल भरणा करावा लागेल असे महावितरण कडून ग्राहकांना सांगितले जात आहे. MSEDCL QR द्वारे ग्राहक बिल भरणा करतो पन महावितरणच्या कार्यालयाला ऑनलाइन बिल भरणा का दिसून येत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे? महावितरणच्या MSEDCL QR भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.