नक्षत्र स्पोर्ट्स अकॅडमी शिरसाड येथील खेळाडूंना सुवर्णपदक…

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव येथील क्रीडा संकुलात 24 व 25 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य शांती खेळ महासंघ राज्यस्तरीय स्पर्धेत शिरसाड येथील नक्षत्र स्पोर्ट्स अकॅडमी मधील ग्रामीण भागातील खेळाडू किरण रवींद्र सोनवणे 200मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक आणि समाधान रतीलाल कोळी 100मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक व लांब उडीमध्ये सुवर्णपदक मिळविले. तसेच कबड्डी स्पर्धेत ब्राँझ मेडल संघामधील समाधान कोळी, अतुल लोधी, जुनेद तडवी, तन्वीर तडवी, अजय भालेराव, अनंत बाऱ्हे, मोहित पाटील, गुणवंत बडगुजर यांनी चांगली कामगिरी करत मिळविले. सर्व खेळाडूंना नक्षत्र स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.