साकळी शिवारात केळीबागेला आग; वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

0

प्रतिनिधी, संदीप चौधरी

यावल( दि.26 एप्रिल ):- तालुक्यातील दहिगाव येथील शेतकऱ्याच्या साकळी शिवारातील केळी बागेला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यात सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दहिगाव येथील महेश पांडुरंग पाटील यांची साकळी शिवारात शेती आहे. तेथे त्यांनी साडेसात हजार खोड केळी लागवड केली आहे. यातील काही प्रमाणात केळीची कापणी झाली होती. पिल बाग उभा होता. या पिल बागाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतात पाइपलाइन टाकली होती. या शेतात मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात केळी पिकासह पाइपलाइन, ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. ही आग शेतात लोंबकळलेल्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वीज वितरण कंपनी, महसूल विभागाला कळवण्यात आले.