5 कोटी निधी उपलब्ध, यावलमध्ये क्रीडा संकुलाचे काम सुरू होणार, आमदार शिरीष चौधरी यांची माहिती, फैजपुरात घेतली महत्त्वाची बैठक

0

प्रतिनिधी, संदीप चौधरी

यावल:- शहरातील क्रीडागणांसाठी ५ कोटी रूपये मंजूर झाले आहे. त्यातून लवकरच कामाला सुरूवात होईल. मैदानासाठी जमीन सपाटीकरण व आराखडा तयार करण्यासाठी वास्तू विशारद ललित राणे यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती आमदार शिरिष चौधरी यांनी दिली. फैजपूर शहरात पार पडलेल्या क्रीडांगण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.फैजपूर येथील डी.एन. कॉलेजमध्ये यावल क्रीडांगण समितीची बैठक पार पडली. त्यात यावल शहरातील क्रीडांगणासाठी पुढील कार्यवाही बाबतची माहिती आमदार चौधरींनी दिली. ते म्हणाले की, यावल शहरातील क्रीडांगणासाठी यापूर्वी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता वाढीव ४ कोटी मिळून एकूण ५ कोटी रुपये निधी उपलब्ध होईल. त्यामुळे सुसज्ज असे क्रीडांगण उभारता येथील. त्यासाठी नियोजित ठिकाणी जमीन सपाटीकरण व आराखडा तयार करण्यासाठी वास्तू विशारद ललित राणे यांची नियुक्ती केली अाहे. तहसीलदार तथा क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष महेश पवार, यावलचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, गटशिक्षण अधिकारी नइमोद्दीन शेख, सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता जे.एस. तडवी, तालुका क्रीडा समन्वयक के.यू. पाटील, हेमंत येवले उपस्थित होते.