देवकर हॉस्पिटलतर्फे २५० जणांची तपासणी; महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगाव, ता. ५ : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस व श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे झालेल्या महाआरोग्य शिबिरात २५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी शिबिरातील रुग्णांच्या पुढील अन्य चाचण्या देवकर हॉस्पिटलमध्ये अवघ्या ५० टक्के शुल्कात करून देण्यात येतील, अशी घोषणाही माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. शिबिराच्या उदघाटनप्रसंगी श्री. देवकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरखतात्या पाटील वंदनाताई चौधरी, अशोक लाडवंजारी, प्रा. वाय. एस. महाजन, वाल्मिक पाटील, विलास पाटील, नामदेवराव चौधरी आदी उपस्थित होते. या शिबिरात प्रामुख्याने नेत्रविकार, हाडांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब व रक्तासंबंधी तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती. त्यांना पुढील उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.शिबिरात तपासणीवेळी प्रत्येक आजारासाठी विशिष्ट तज्ज्ञांची संपूर्ण टीम कार्यरत होती.  सकाळी १० ते दुपार २ या वेळेत झालेल्या शिबिरात डॉ. प्रशांत साठे, डॉ. मनोज पाटील, पंकज महाजन, सचिन इंगळे, अभिजित पाटील, निरंजन चव्हाण, अनुश्री व्ही. शाहीद खान, वैभव गिरी, अतुल सोनार, शैलजा चव्हाण, स्वप्नील गिरी, नयना पाटील, श्रीराज महाजन, समीर चौधरी, तेजस पाटील, नीरज चौधरी, सुभा महाजन, प्रियांका चौधरी, अमित नेमाडे, अश्‍विनी चव्हाण, अनंत पाटील यांनी रुग्ण तपासणी केली. शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. नितीन पाटील यांनी काम यांनी काम पाहिले.