धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना

0

धरणगाव :- दि.१८ मे रोजी तालुक्यातील झुरखेडा येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे. पुढील वृत्त असे की,
● मंगल धनसिंग बाविस्कर रा.झुरखेडा यांच्या राहत्या घराचे काम चालू होते त्यामुळे ते त्यांच्या लहान भावाच्या खालच्या घरात सामान टाकून राहत होते त्यात असे की, त्यांच्या घराचा सल्याब टाकला गेला होता त्यामुळे ते त्या दिवशी रात्री ज्या भावाच्या खालच्या घरात सामान टाकले होते तिथे न झोपता  त्याच्या स्वतः च्या काम चालू असलेल्या जागी झोपायला गेले असता त्याच्या भावाच्या खालच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून त्यांनी अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये रोख रक्कम व पाच ते दहा ग्रॅम सोन्याचे दागिने गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशी माहिती त्यांनी प्रत्यक्ष फोनवरून माहिती दिली.
● जीवन चिंतामन पाटील हे जवळच असलेल्या निमखेडा गावातील रहिवाशी असून त्यांचे तुषार मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर्स झुरखेडा येथे या नावाने चालवतात त्या दिवशी रात्री नेहमी प्रमाणे ते मेडिकल बंद करून घरी गेले व त्याच रात्री त्याच्या तुषार मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर्स या दुकानात चोरी झाली असे त्यांना कळाले सकाळी त्यांनी मेडीकल दुकानात जाऊन चेक केले असता दरवाजा तोडून गल्ल्यातून एखाद्या हजाराची चिल्लर गेली आहे अशी माहिती मेडिकलचे मालक जीवन पाटील यांनी प्रत्यक्ष फोनवरून माहिती दिली.


● जागृती दूध उत्पादन सहकारी सोसायटी झुरखेडा (दुधाची डेअरी) चा दरवाजा तोडून कपाटातील एक ते दिड हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे अशी माहिती कॉम्पुटर ऑपरेटर कैलास चौधरी यांनी प्रत्यक्ष फोनवरून माहिती दिली. वरील तिन्ही ठिकाणी धरणगाव पोलीस स्टेशनचे बिटचे हवालदार पवार साहेब व गावातील पोलीस पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन फोटो काढून चौकशी केली आहे अशी माहिती गावातील पोलीस पाटील प्रल्हाद चौधरी यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे.