शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावरून धरणगाव तालुक्यातील भोद येथील रहिवाशी राजेंद्र पाटील यांनी आपल्या पत्नी व मुलीसह  केली सामुहिक आत्महत्या

0

धुळे :- दि.१८ मे रोजी धरणगाव तालुक्यातील भोद येथील व धरणगाव एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले भाजप चे तालुका उपाध्यक्ष यांनी पत्नी व मुलीसह सामुहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे .
राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी व मुलगी यांच्यासही शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापीनदीत उडी घेतल्याचे माहिती प्राप्त होत आहे . दो दिवसांपासून त्यांची गाडी पुलावर बेवारस लागली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील ( वय -५३ ) , पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील ( वय -४३ ) , मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील ( वय -२० ) हे तिघ जण टाटा कंपनीच्या इंडीका गाडी क्र. ( एमएच -१ ९ / एपी -१०९ ४ ) गाडीने दि .१७ रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला उत्तराकार्याचा कार्यक्रमासाठी ते स्वतः ,पत्नी व मुलीसोबत घरून आले होते. तेथुन ते त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले मात्र , ते भोदला पोहचलेच नाही . दरम्यान संध्याकाळी ६ वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळच्या तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. त्यानंतर दि.१८ मे रोजी दुपारी ४ वाजता राजेंद्र पाटील यांचे प्रेत नदीत तरंगतांना दभाशी येथील गावकऱ्यांना दिसल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. रात्री उशिरा राजेंद्र पाटील यांच्या मृतदेह बाहेर काढण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलीचा शोध चालू झाला काही वेळानंतर  मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला व तो बाहेर काढण्यात आला . दरम्यान , राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा शोध घेतला जात होता. बुधवारी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात येणार आहे .


घटनेची बातमी कळताच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील , गुलाब बाबा पाटील व भोद येथील सरपंच राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर मदत कार्यात वेग आला असे त्यांच्या कडून सांगण्यात आले. ह्या यासंदर्भात शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रमेश पवार व पणन संघाचे संचालक संजय पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे

आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात

राजेंद्र पाटील यांच्या कुटूंबियांसोबतच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे . सासरवाडीला अतिशय सामान्य परिस्थितीत घरून निघालेल्या या कुटूंबाने थेट तापी नदीत उडी का घेतली ? सधन असलेल्या या कुटूंबाला आर्थिक चणचण असण्याचे काही कारण नाही . शिवाय राजेंद्र पाटील हे अतिशय हींमत्वान माणूस होता . मग , त्यांनी पत्नी , मुलीसह आत्महत्या का केली असावी . आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली आहे का ? आत्महत्येस काही कौटुंबिक वाद विवाद आहेत का ? याबाबत देखील शंका उपस्थित करण्यात येत आहेत . संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे .