तिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करावे; रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान महत्वाचे पालकमंत्री छगन भुजबळ

0

आरोग्य सुविधांच्या बळकटीवरणावर भर देण्यात यावा कृषिमंत्री दादाजी भुसे

नाशिक :- येथे आज,राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना आढावा बैठक झाली.

▪️कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर यांचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या अनुषंगाने लहान मुलांच्या उपाचारासाठी स्वंतत्र कक्ष तयार करण्यात येवून त्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येच्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये कोरोना निर्बंध पाळण्यासाठी समुपदेशन व प्रबोधन करून योगदान द्यावे.

▪️जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यात 29 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ज्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

        कृषिमंत्री दादाजी भुसे

▪️कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्व शासकीय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात यावे, जेणेकरुन येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरे जातांना अडचणी निर्माण होणार नाही. शहराला लागून असलेल्या तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, नियमबाह्य लग्न सोहळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पोलीस विभागाला बैठकीत दिल्या आहेत.