जागतिक महिला दिन निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

0

नाशिक :- येथे दि. ०८ मार्च  रोजी जागतिक महिला दिन निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने समाजातील विविध थरांतील कर्तबगार महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कारार्थी महिलांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे मॅडम, मनपाच्या झाकीर हुसैन रुग्णालयाच्या डॉ. अनिता हिरे व कोविड योद्ध्या महिला कर्मचारी, अंबड पोलीस स्टेशनच्या राऊत मॅडम, मोरे मॅडम, भालेराव मॅडम तसेच इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक बरेला मॅडम व महिला पोलीस कर्मचारी संध्या नाटकर, लीला लांडगे, अश्विनी काळोदे, पुजा कुमावत, लीला थोरात, व अश्विनी पवार व विमल पाचोरे, पंचवटी अमरधाम येथील कर्मचारी सुनीताताई पाटील व प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेड मध्ये भाग घेतलेल्या नाशिक येथील ज्योत्स्ना कदम यांचा समावेश होता. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा कामिनिताई दोंदे व पद्मिनिताई वारे, शहराध्यक्षा अरुणाताई पाटील, माजी नगरसेविका कांचनताई पाटील, वृंदा आहेर, उज्ज्वला थूल, स्वप्नाली केदारे,  सुलभा कदम आदि पदाधिकारी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्षा अरुणाताई पाटील, नगरसेविका कांचनताई पाटील, उपशहराध्यक्षा उज्जवला थूल, सुलभा कदम, यांनी विशेष परिश्रम घेतले.