खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या आदेशाने तातडीने रोहित्र बसविल्यामुळे मोंढाळे प्र उ ता .पारोळा येथील शेतकऱ्यांची पिके वाचली

0

मोंढाळे प्र उ ता.पारोळा:- गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मोंढाळे प्र.उ.ता .पारोळा येथील रोहित्र जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल व पिकांचे प्रचंड नुकसान होत होते. विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध असताना केवळ डीपी जळाली असल्याने मका, भुईमुग, गहू, हरभरा पिके धोक्यात आली होती. शेतकरी हवालदिल झाले होते. तर शेतकऱ्यांनी वेळीच ६५%रक्कम भरून देखील महावितरणचे स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडावीचे उत्तरे देत होती. पारोळा बायपासवरील पुनगाव रस्त्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे सरपंच बळवंत बाविस्कर व अनिल गुलाब पाटिल, मनोहर शिवाजी पाटील,अनिल सुरेश पाटिल यांनी ही समस्या मांडली होती. याप्रसंगी नगराध्यक्ष करण दादा पवार यांचेसह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तातडीने पाचोरा उपविभागाचे अधिकारी यांना आदेशीत करीत शेतकऱ्यांनी पैसे भरून देखील रोहित्र का जोडले नाही याचा जाब विचारला होता. दोन दिवसांत डिपी बसविण्याचे आदेश दिले होते. आज अखेर हे रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. वेळीच रोहित्र बसविल्याने शेकडो एकर जमिनीवरील पिके वाचली आहेत. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या धडाडीमुळे तातडीने रोहित्र बसविण्यात आले. याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो अशी भावना या शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.