वाळूची तस्करी करणारे २ ट्रॅकटर जप्त ,दोन अटकेत ,रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0

रावेर,( प्रतिनिधी )दि.१ डिसेंबर :- शहरातील वाळू तस्करी करणारे २ ट्रकटर वेगवेगळया ठिकाणी रावेर पोलिसांनी पकडून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वाळू तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाई करीत वाळू वाहतुक करणारे २ ट्रकटर पकडले असुन दोघांना अटक करण्यात आली आहे. रावेर बऱ्हाणपूर रोडवर कारवाई करण्यात आली .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रात्री १:३० वाजेच्या सुमारास आंबेडकर चौकातून रावेर शहरात येत असताना स्वराज कंपनीचे ट्रॅकटर पकडण्यात आले.रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र सुरवाडे, सुरेश मेढे, उमेश नरवाडे, नितीन ढाबरे, सोनू तडवी या पथकाने कारवाई केली. तसेच सोनालीका कंपनीचे ट्रॅकटर रावेर बऱ्हाणपूर रोडवर पकडण्यात आले आहे. दोघे ट्रॅकटर जप्त करून सलमान शेख हसन (राहणार इमाम वाडा रावेर ) व मनोज तुकाराम कोळी (राहणार अटवाडा ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे महसूल विभागा ऐवजी रावेर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केलेली आहे यापूर्वीही रावेर पोलिसांनी वाळू तस्करांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे.