प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी !

0

मान्यवरांचा महामानव चरित्र ग्रंथाने यथोचित सन्मान

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र शाखा लातूर व आर पी आय यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आर पी आय चे डॉ. सुधाकर गुळवे यांची उपस्थिती होती. सकाळी १० वाजता आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिरात अनेक पत्रकारांनी रक्तदान केले. सायंकाळी पाच वाजता गंजगोलाई येथे सुशोभित स्वागत स्टेज तयार करून डॉ. बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले. आपल्या भाषणात डॉ. सुधाताई कांबळे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानव जातीला विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोलाचे कार्य केले असून विश्वाला एक दिशा देण्याच्या कामी बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या एवढ्या पत्रकार संघटना असल्या तरी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ एकमेव संघ आहे जो प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहे. आपल्या मनोगतात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकूमार शिंदे म्हणाले की , नव्वदच्या दशकात प्राध्यापकी करत करत डॉ. बाबासाहेबानी मूकनायक हे पाक्षिक चालवले आणि त्यानंतर प्रबुद्ध भारत, जनता ही पाक्षिके चालवून समाजाला दिशा देण्याचं काम केले असून त्यांचे लिखान म्हणजे आजही समाजासाठी आधारस्तंभच आहे. ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, डॉ. सुधाकर गुळवे, डॉ. सितम सोनवणे, विजय गायकवाड, अर पी आयचे चंद्रकांत चिकटे, अनंत लांडगे, हतिम शेख, ॲड राम वाकुडे, डी एल वाघमारे व सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष यांचा यथोचित सत्कार करून महामानव चरित्र ग्रंथाने सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे पत्रकार शेरखाने, खंडेराव देडे, नितीन चाळक, विजय गायकवाड, हतीम शेख, अभिमन्यू सूर्यवंशी, महादेव पोलदासे, कावेरी विभुते भागीरथी, जयदेवी कांबळे शिल्पा कांबळे पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.