सुधारित जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीची 11 मार्च पर्यंत विशेष मोहिम !

0

जळगाव दि. 28: – जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.२३ फेबुवारी, २०२४ ते ११ मार्च, २०२४ या कालावधीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांअतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच ३१ जानेवारी २०२३ अखेर व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेशीत विदयार्थी, सेवा, निवडणुक, या प्रयोजनाच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेली असून अशा अर्जदारांना जाहीर आवाहन करण्यात आले होते , दिनांक ०५ व ७ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगांव येथे त्रुटी पुर्तता शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सीईटी सेल अंतर्गत अर्ज भरले आहे. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांचे अर्ज या कार्यालयात जमा करण्यात यावे. जेणेकरुन सदर कालावधीत विद्यार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे अवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी केले आहे.