17 जानेवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन – विजय चाटी

0

नंदुरबार, दि. 15 (जिमाका वृत्त) – केंद्र शासनाच्या पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविल आहे. ही कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. चाटी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.