महिला लोकशाही दिनाचे 18 डिसेंबर रोजी आयोजन – राजेंद्र बिरारी

0

नंदुरबार, दि.12 (जिमाका वृत्तसेवा) – महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार माहे डिसेंबर 2023 महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 18 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 11.00 वाजेपर्यंत स्वतः उपस्थित राहून सादर करावे. असेही श्री. बिरारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.