यावल महाविद्यालयात राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचलित.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहु महाराजांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला इतिहास विभागाचे प्रा संतोष जाधव यांनी शाहू महाराजांच्या कार्यांचा जीवनपट सादर केला. त्यांनी शाहू महाराजांनी मागास जातीतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकी पेढ्या सुरू करून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या.समाजातील जातीभेद उच्चाटन करून शेती उद्योग व शैक्षणिक कार्य केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी शाहू महाराजांविषयी विचार मांडताना मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध योजना सुरू केल्या असे सांगितले. तसेच व्यावसायिक शिक्षणाची बाजू विशद केली. आदर्श राजा व दलित समाजाचे नेते असा महाराजांचा नावलौकिक होता असे विचार मांडले. तसेच अस्पृश्यता निर्मूलनावर त्यांनी केलेल्या कार्याची आठवण सुद्धा करून देण्यात आली.यावेळी भालोद महाविद्यालयातील प्रा.आर बी इंगळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य. प्रा.एम डी खैरनार, उपप्राचार्य. प्रा.अर्जुन पाटील,प्रा. डॉ.हेमंत भंगाळे,प्रा.डॉ.एस पी कापडे,प्रा.डॉ.आर डी पवार,प्रा.डॉ.पी व्ही पावरा,उपस्थित होते.प्रा.डॉ संतोष जाधव,प्रा.डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.मिलींद मोरे,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.गणेश जाधव,प्रा सुभाष कामडी,प्रा छात्रसिंग वसावे श्री मिलिंद बोरघडे श्री,संतोष ठाकूर श्री प्रमोद भोईटे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.