साकळी येथे बिजप्रक्रिया प्रशिक्षण व कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

साकळी ता.यावल:- कृषी विभाग यावल व नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. तसेच आत्मा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साकळी परिसरातील शेतकरी बांधवांकारिता यंत्र साहाय्याने बीज प्रक्रिया प्रशिक्षण व कार्यशाळेचे दि.१६ रोजी साकळी येथील मुख्य चौकात आयोजन करण्यात आलेली होते.या कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी एस.बी.सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली योजली होती.या कार्यशाळेला मंडळ कृषी अधिकारी ए.एस.खैरनार,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आर.एम.जाधव (यावल), कृषी सहाय्यक एम. एस. मिटके यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेला शेतकरी बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.अलीकडच्या काळात हवामानात मोठे बदल झाल्यामुळे शेती व्यवसाय करणे शेतकऱ्यांना आव्हानात्मक बनले आहे.त्यासाठी शेतीत विविध प्रयोग करून चांगल्या प्रकारे शेती करता येते.याचाच एक भाग म्हणून यंत्राच्या साह्याने बीज प्रक्रिया केल्याने शेतकऱ्याला शेतातील उत्पन्ना फायदा होत असतो.असे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. या कार्यशाळेस उपस्थित सर्व शेतकरी व अधिकाऱ्यांचे नेवे फार्मर प्रोड्युसर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास नेवे यांनी आभार मानले.या कार्क्रमला नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनी चे संचालक चंद्रकांत नेवे, दिपक महाजन तसेच संजय पाटील, दिपक पाटील, किरण महाजन उपस्तित होते.