साकळी येथील शेतकऱ्याने सीएमव्ही रोगग्रस्त झालेली संपूर्ण केळीबाग उपटून फेकली !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी; शेतकरी झाले हतबल

साकळी ता.यावल:- येथील एका शेतकऱ्याने भाडे तत्वा केलेल्या शेतात लावलेली संपूर्ण केळीबाग सीएमव्ही या भयंकर आजाराने ग्रासली गेल्याने या शेतकऱ्याने जवळपास दहा हजार खोडांची संपूर्ण केळीबाग अक्षरशः उपटून फेकली आहे. संबधित शेतकऱ्यावर जणू आस्मानी संकट कोसळले असून या शेतकऱ्याचे जवळपास सहा लाखांचे नुकसान झालेले आहे. तरी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याकडून केली जात आहे. सविस्तर माहिती अशी कि,साकळी ता.यावल येथील रहिवासी असलेले शेतकरी सुनिल पंडित बडगुजर यांनी साकळी शेत शिवारात गट नं. १७५ क्षेत्र २.६२ आर हे शेत भाडेतत्त्वावर केलेले आहे.या शेतात त्यांनी जैन टिश्यू कंपनी कडून केळीचे रोप घेऊन सदर शेतक्षेत्रात एकूण १० हजार ३०० रोपांची लागवड केली होती.त्यानंतर या केळीबागा सीएमव्ही आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला.त्यामुळे लावलेल्या केळीच्या रोपांपैकी जवळपास ५० ते ६० टक्के रोपांवर आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने खराब झालेले रोप काढून त्या ठिकाणी नव्याने जवळपास सात हजार रोपांची पाच ते सहा टप्प्यात जुनावन (पुन्हा लागवड) केली.तरीही केळी बागावरील रोग आटोक्यात येत नसल्याने दि.१२ ऑक्टोंबर २०२२ रोजी पासून संबंधीत शेतकऱ्यांने मजूर लावून संपूर्ण बाग उपटायला सुरुवात केली व दिवसभरात शेतातील संपूर्ण झाडे उपटून बांधावर फेकून दिली.सदर क्षेत्रात केळीबाग उभी करत असताना सात वेळा रोग वेगवेगळ्या प्रकारे रोगप्रतिबंध फवारणी,रासायनिक खतमात्रा देणे,शेणखत देणे,तीन वेळा ड्रिचिंग देणे,मजुरी, मशागत,शेताचे भाडे व इतर खर्च अशा प्रकारे जवळपास सहा लाख रुपये खर्च श्री.बडगुजर यांनी केलेला आहे. मोठा खर्च लावून व स्वतःच्या मुलाबाळप्रमाणे जिव लावून जीवापाड कष्ट व मेहनत घेऊन उभी केलेली केळीची बाग उपटून फेकत असताना शेतकरी श्री.बडगुजर हे अतिशय हतबल व भावना विवश बनले होते. दरम्यान साकळीचे तलाठी व्ही.एस.वानखेडे व कृषी सहाय्यक अधिकारी चौधरी साहेब यांनी एकत्रितपणे सदर शेतातील नुकसानीबाबत पंचनामा केलेला आहे. तरी माझ्या शेतात सीएमव्ही आजाराने रोगग्रस्त झालेल्या केळी बागामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून शासनाने मला लवकरात लवकर भरपाई द्यावी तसेच केळी विम्याच्या धोक्यामध्ये सीएमव्ही आजाराचा समावेश करण्यात यावा अशी मागणी श्री. बडगुजर यांनी केलेली आहे.