यावल महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचे आयोजन…

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- यावल महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचे आयोजन. ज जि म वी प्र सहकारी समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे दिनांक ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी शनिवारी ठीक सकाळी दहा वाजता क्रेडिट एक्सेस ग्रामीण मायक्रो फायनान्स मार्फत प्लेसमेंट सेलचे (रोजगार संधी) योजनेचेआयोजन करण्यात आलेले आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसोबत महाविद्यालयात उपस्थित राहावे.

विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत.

1) अपडेट रिझुम (परिचय पत्र)
2) शैक्षणिक पात्रता बारावी/आयटीआय/पदवी उत्तीर्ण
3) दोन पासपोर्ट फोटोज
4) आधार कार्ड
5) शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रति