यावल महाविद्यालयात युथ इनोव्हेशन अँड स्टार्ट अप्स वर मार्गदर्शन

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जळगाव येथील भरारी फाउंडेशन, आय.क्यू. ए.सी. विभाग व करियर गायडन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ”युथ इनोव्हेशन्स अँड स्टार्ट अप्स” या विषयावर डॉ. युवराज परदेशी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. कार्यक्रमात श्री दीपक परदेशी (स्वीय सहाय्यक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग), तुषार भामरे व मोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये सुप्त गुणांना चालना देण्यासाठी भारत सरकारने स्टार्ट अप्स च्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली असून संधीचे सोने करावे असे प्रतिपादन केले. डॉ.परदेशी यांनी स्टार्ट ॲप्स मुळे आजचा युवक स्वतःच्या पायावर उभा राहून रोजगार संधी उपलब्ध करू शकतो त्यामुळे स्वयंरोजगार व उद्योगजता वाढू शकते असे मार्गदर्शन केले. श्री दीपक परदेशी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील समस्या दूर करण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी मदत करू असे सांगितले.कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. एम.डी. खैरनार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आय क्यू एसी समन्वयक डॉ. एच. जी. भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. डी. पवार, प्रा.मनोज पाटील, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. इ. आर. सावकार, प्रा. संजीव कदम, प्रमोद कदम, डी डी चौधरी,ए बी पाटील, अनिल पाटील, संतोष ठाकूर, साहेबराव अहिरे, राजाराम पाटील, प्रमोद जोहरे,डी डी पाटील, प्रमोद भोईटे आदी यांनी सहकार्य केले.