किनगाव व परिसरात होणाऱ्या संततधार पावसामुळे कापुस , मका, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात

0

प्रतिनिधी, दिपक नेवे

यावल:- गेल्या आठ दिवसांपासून यावल तालुक्याच्या पश्चिम भागातील चिंचोली नायगाव किनगाव आडगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस मका सोयाबीन उडीद मुंग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून , बळीराजा आर्थिक संकटात सापडला असुन ,शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. अशी मागणी तालुक्याच्या पश्चिम भागातील असंख्य शेतकरी बांधवांनी केली आहे. आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांचे अधिकतर कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातात तोंडाशी आलेला घास या निसर्गामुळे वाया जाणार असून शेतकऱ्यांचे कापसाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. जून महिन्याच्या प्रारंभी लागवड झालेल्या कापूस पिकांच्या कैरीला अक्षरशः कोंब आले असून पहिला कापुस काढणीचा हंगाम संपूर्ण वाया जाणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी कापसाच्या कैऱ्या झाडावरच सडल्या असून त्या सडलेल्या कापसाच्या कै-या तोडण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा मजुर लावुन त्या कै-या तोडाव्या लागणार आहे. अजून दोन दिवस जर पाऊस सुरू राहिला तर शेतकऱ्यांचे पन्नास टक्के नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात आडगाव कासारखेडे नायगाव चिंचोली सह परिसरात जून महिन्याच्या प्रारंभी लागवड झालेल्या कापसाचे अधिक नुकसान झालेले दिसून येत असुन यासाठी शेतकऱ्यांनी जास्त नुकसान झालेल्या कापूस पिकांचे पंचनामे करण्याची ही मागणी केली आहे. मका पिकांवर हे अति पावसामुळे आळ्यांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मका पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे तर काहींनी मे महिन्यात लागवड केलेला मका शेतातच तोडून पडल्याने संततधार पावसामुळे मका पिकांचे हे नुकसान झाल्याचे समजते.परीसरातील चिंचोली सह आडगाव कासारखेडा किनगाव नायगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजते.