लंम्पी स्कीन आजाराच्या प्रतिबंधक लसीकरणात; युद्धपातळीवर मोहीम राबवणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा साकळी ग्रा.पं. कडून सत्कार

0

प्रतिनिधी, दिपक नेवे

यावल:- साकळी गावात गाई व म्हैस वर्गीय जनावरांचा लंम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारांमुळे पाळीव जनावरे दगावू नये व पशुपालक व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून साकळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लंम्पी स्कीन आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार दि.२५ रोजी पासून साकळी ग्रामपंचायत प्रशासन व गावातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्तिक सहकार्यातून गावात घरोघरी जाऊन उपलब्ध लसीच्या मात्रेतून गाय व म्हैस वर्गीय जनावरांना युद्धपातळीवर लसीकरण सुरू करून जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. साकळी गावात लंम्पी लसीच्या लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही मोहीम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान या मोहिमेत दिवस-रात्र मेहनत घेऊन व मुक्या जनावरांची सेवा करण्याची कामगिरी बजावणारे साकळीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज पाटील व यावल पशुधन पर्यवेक्षक डॉ.वाय.जी.नेवे या दोघांचा दि.२७ ऑगस्ट २०२२ रोजीच्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत शाल- श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच सौ सुषमा विलास पाटील,ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी,श्रीमती अलका नागो पाटील, सौ.रबाना सलीम तडवी,सै.अश्पाक सै.शौकत,शरद बिऱ्हाडे,रईस कुरेशी,ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांचेसह कनिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,लीलाधर मोरे हे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.